Thursday, 9 April 2015

IAS RAMESH GHOLAP


रमेश घोलप (भा.प्रे.से.)

'टर्निग पॉईंट'
-----------
....अपयश पाठ सोडायला तयार नव्हतं.मनात
प्रचंड खळबळ
माजली होती.यू.पी.एस्.
सी. पूर्व
परीक्षेतील
अपयशापेक्षा ग्रामपंचायत
निवडणूकीमध्ये
अक्काच्या झालेल्या या पराभवाने मनात खोलवर
वार केला होता.माणसाला सातत्यानं अपयश आलं
की दोनच
गोष्टी होतात-एकतर तो खचून
जातो किंवा खूप मोठं
काहीतरी घडवतो.पराभव
खूप जिव्हारी लागला होता.
डोळे पुसले.खूप लोक आणि मित्र घराजवळ
जमा झाले होते.आता मनानं बोलायला प्रवृत्त
केलं.सगळ्यांचे पाणावलेले डोळे पाहिले
आणि बोलू
लागलो,"आता नाही काढता आली मिरवणूक...ठीक
आहे.आता त्याच वेळी मिरवणूक
काढू जेंव्हा मी क्लास वन
अधिकारी होईन.आज गावातून
जातोय.आता त्याचवेळी गावात परत
येईन,जेंव्हा मी कलेक्टर
होईन." बॅग
भरली.वडीलांच्या फोटोचं
आणि अक्काचं दर्शन घेतलं व घराबाहेर
पडलो.गावातून बाहेर पडताना डोळे भरून
पाहिलं..गावाला आणि गाववाल्यांनाही.
..
आज वाटतं, ग्रामपंचायतीच्या
निवडणूकीत
अक्काचा झालेला पराभव हाच
माझ्या आयुष्यातील 'टर्निग पॉईंट'
होता.कारण-
"जिंकण्याच्या निश्चयानं,
जेंव्हा गांव सोडलं होतं.
यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल,
तेंव्हाच पडलं होतं."



collection:*Mahesh kadam






























No comments:

Post a Comment