
डॉक्टरांचे दुर्लक्ष हरिओमच्या वडिलांच्या जिवावर बेतले. परंतु आईने घरातील जुने सामान विकून मुलांचे शिक्षण सुरूच ठेवले. एनआयटीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तो कुुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटू लागला आहे. संशोधक होण्याची त्याची इच्छा मात्र दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बरदाही गावातील हरिओम प्रकाशची कहाणीचा संदेश वाईट काळ सांगून येत नाही, असा आहे. परिस्थिती कशीही आली तरी हिंमत हारता कामा नये. सुपर-30 मध्ये येणारे विद्यार्थी अतिशय गरीबीतून येथे येतात. हरिओमचे वडील रामकृपाल महतो रसायनशास्त्राचे प्रोफेसर होते. त्यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय वाईट होती. एकदा महतो यांना खोकला आला. स्थानिक डॉक्टरांनी टीबी समजून उपचार सुरू केले. परंतु अशा प्रकारच्या उपचारामुळे त्यांचे मूत्रपिंड खराब झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांना प्राण गमवावे लागले. चार मुलांच्या कुटुंबात कमवणारी दुसरी व्यक्ती नव्हती. ते एकदम रस्त्यावर आले.
RELATED
DIVYA EDUCATION: एजेकेएमसीआरसीच्या मीडिया आणि अॅक्टिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेशDIVYA EDUCATION: एजेकेएमसीआरसीच्या मीडिया आणि अॅक्टिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेशDIVYA EDUCATION: आयआयटी, भुवनेश्वरच्या एमटेक-पीएचडी पाठ्यक्रमात प्रवेश
मुले छोटी होती. आई वीणा देवी अशिक्षित होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी वीणा देवी यांना अस्थायी काम मिळाले. पुढे प्रदीर्घ खडतर वाटचाल सुरू झाली. तुटपुंज्या पगारीत त्यांचा उदरनिर्वाह कठीण होता. पुस्तकांच्या खरेदीसाठी त्यांना नेहमीच पुस्तके विकावी लागत. काही दिवसानंतर त्यांच्या घ्ांरात विकण्यासारखे काही राहिलेच नाही. हरिओमचे शालेय शिक्षण एका सरकारी शाळेत झाले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो एक दिवस आईसोबत मला पाटण्यात येऊन भेटला. संकोचाने भरलेला. आतून प्रचंड इच्छाशक्ती असलेला आणि एका चांगल्या संधीची प्रतीक्षा करणारा हरिओम समोर हजर होता.
कुटुंबात अचानक आलेला बदल स्वीकारून वाटचाल करणारा हरिओम प्रतिभावंत आणि कष्टाळू होताच. त्याचबरोबर स्वभावात बुजरेपणाही तितकाच. तो काहीतरी नक्की करेल, असे मी पहिल्या भेटीतच ओळखले होते. पराजय स्वीकारणार्यापैकी तो नव्हता. कारण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून तो शालेय शिक्षण पूर्ण करूच शकला नसता. तो सुपर-30 मध्ये सहभागी झाला. मी नेहमीच त्याला कष्ट करताना पाहिले आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीवर केवळ कष्टातून मात केली आहे. हरिओमला संशोधक होण्याची इच्छा होती. परंतु सर्वात अगोदर त्याला आर्थिक पातळीवर स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा होती. 2005 मध्ये आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत त्याची निवड होऊ शकली नव्हती. परंतु एनआयटीमध्ये त्याला पसंतीची विद्याशाखा मिळाली. त्याच्याकडे प्रवेशाशिवाय कोणताही मार्ग नव्हता. त्याने प्रवेश घेतला. आपल्या क्षमतेने जेवढे शक्य होते. त्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. सातत्य ठेवले. शिक्षण पूर्ण केले.
पहिल्या नोकरीच्या रुपाने त्याला प्रतिष्ठेच्या एनटीपीसीमध्ये नोकरी लागली. या बातमीने कुटुंबाची दिशाच बदलली होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर आलेला वाईट काळ जणू हळूहळू निघून जात होता. दु:खाचे ढग विरून जात होते. आपल्या यशाबद्दल सांगायला तो आला होता. परंतु त्याच्या तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. मी त्याच्या मनाची घालमेल समजू शकत होतो. त्याला वडिलांची आठवण येत होती. त्याच्या यशाला पाहण्यासाठी वडील समोर नव्हते. आईने अतिशय वाईट काळ पाहिला होता. हरिओमचे तीन भावंडे चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात आणि उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने जात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतरचा हा काळ आता भूतकाळाचा एक भाग आहे. परंतु महतो कुटुंबातील एकही सदस्य या गोष्टीला विसरू शकत नाही. प्रोफेसर महतो हयात असताना त्यांच्या कुटुंबाची नियती कशी परीक्षा घेईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. धैर्य आणि कष्टातून शेवट गोड झाला. संशोधक होता आले नाही, याची हरिओमला खंत आहे. परंतु तुटपुंज्या नोकरीच्या आधारे संघर्ष करणार्या आईच्या चेहर्यावर आनंद पसरला. त्यामुळे सध्या मला जी भूमिका मिळाली आहे. त्यावर अधिक काम करेल. हे मी नव्हे ईश्वराने माझ्यासाठी निवडलेले आहे. मी प्रामाणिकपणे त्याला पूर्ण करेल. सर, परिश्रमात कसर सोडणार नाही. मला त्याच्या म्हणण्यावर विश्वास आहे. कष्टात तो कधीही मागे राहिला नाही.
No comments:
Post a Comment